विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकरिता ठासणी बंदूक बनवून केली कमाई; ठासणी बंदूक बनली शेतकऱ्याकरिता फायद्याची…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील दिग्रस बु परिसरातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसमुळे त्रस्त झाले होते.या गोष्टींचा विचार करून शाळा बंद असल्याने युवकाने युक्ती लढवून काही पैसे कमवून घरी मदत होईल या आशेने परीस गवई व सावन गवई या दोघांच्या साथीने ठासणी बंदूक बनवून हजारो रुपये कमविले आहे.

ठासणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य दोन इंचि मोठा पाईप, एक फुट, दिड इंच पाईप ,एक फुट हेड कॅफ, गॅस लाईटर असे साहित्य लागते.या मधून शेतात मोठा कर्कश आवाज येत असल्याने वन्य प्राणी पळून जातात परिणामी त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.

आणि वन्यप्राण्यामुळे त्रस्त असलेले शेतकरी यांच्याकडून मोठी मागणी वाढली आहे.या परिसरात वन्यप्राण्यापासून संरक्षण होत असल्याचे चित्र आहे.या पासून शरीराला कोणतिही जिवीत हानी होत नाही.

तसेच याचा वापर रानटि वन्य जनावरांना पासून शेतातील पिकांचे नुकसान वाचते.हा युवक दिग्रस बु परिसरात बसस्थानक चौकात बसून ठासणी बंदूक प्रात्यक्षिक करून दाखवीत असतो.त्यामुळे शेतकरी अगदी सोपे व सहज येत असल्याने याची मागणी वाढली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here