कोल्हापूर – राजेद्र ढाले
कणेरी (ता.करवीर) येथील यश बेकरी मधील गुरुवारी(ता.19) सायंकाळी 8 ते शुक्रवारी सकाळी 9 च्या दरम्यान चोरट्यांनी पत्र्याचे शेड उचकटून तिजोरीतून 83 हजार 500 रुपये रोक रक्कम लंपास केली.कंपनीचे मालक रावसाहेब सिद्धराम वंदुरे (रा.मंगळवार पेठ कोल्हापूर) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात फिर्याद दिली.काॅन्स्टेबल शेख अधिक तपास करीत आहेत.