अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात जिल्हा कॉंग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदन…अन्याय कारक इंधन दरवाढ त्वरीत मागे घ्या…भुषण गायकवाड

अकोला । प्रतिनिधी
भाजपा प्रणीत केंद्र सरकारने दैनंदिन जीवनात दळणवळण साठी अत्यावश्यक असणारे पेट्रोल व डिझेल यांच्या भावात विक्रमी दरवाढ केल्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे .तसेच समाजातील शेतकरी व कष्टकरी यांना या जाचक इंधन दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे .

तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई आणखीनच जास्त वाढली आहे .अश्या आशयाचे निवेदन आज अकोला जिल्हाधिकारी यांना अकोला कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाने कोविड १९ च्या अनुशंगाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून निवेदन देण्यात आले आहे .


तसेच या केंद्र सरकार च्या जाचक धोरणावर फेरविचार करून माननीय राष्ट्रपती महोदयांनी इंधन दरवाढीचा निर्णय तत्काळ माघे घ्यावा अशाप्रकारची विनंती सदरील निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांना केली आहे ..जर या केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या जाचक धोरणा विरोधात केंद्र सरकारने फेरविचार करून तत्काळ इंधन दरवाढ माघे घेतली नाही

तर यापुढे कॉंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी , असा इशारा सदरील निवेदनाद्वारे कॉंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड व महानगराध्यक्ष आकाश सिरसाट यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .

यावेळी सोबत कॉंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाचे ब्रम्हदास इंगळे, भाई अंभोरे, जितेद्र बगाटे, मुकींदा अंजनकार सह कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here