अहमदपूर एसटी वर्कर्स संघटनेच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

बालाजी तोरणे – अहमदपूर

अहमदपूर कोरोना (कोविड-१९) या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे भारत देशासह महाराष्ट्र राज्याला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. सदर आपत्तीमुळे अर्थव्यवस्थे सह सर्वसामान्यांचे जीवन कोलमडले आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारने दिनांक २३ मार्च पासून एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णयामुळे एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे महामंडळास कोट्यावधी रुपयाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

महामंडळाची आर्थिक परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे तसेच सध्या राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा ६००० कोटींहून अधिक आहे. अशा परिस्थितीत महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे डिझेल खर्च व इतर खर्च भागवणे अवघड झाले आहे.

कोरोना महामारी मुळे एसटी महामंडळाला झालेला तोटा व संचित तोटा पाहता कर्मचाऱ्यांचे वेतन व प्रवाशांना दर्जेदार किफायतशीर सेवा देण्यासाठी शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय शक्य नाही.

संदर्भ क्रमांक २ अन्वये एसटी प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार ५० टक्के वेतन अदा केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजा भागविणे शक्‍य नाहीत तसेच पगार कपातीमुळे कर्मचारी व कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील जनतेला किफायतशीर घरात दर्जेदार व सुरक्षित सेवा देण्यासाठी पुढील मागण्यांची पूर्तता करण्यात यावे.

१. रा. प.महामंडळास कोरोना च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने १००० कोटी रुपये अनुदान देण्यात यावे.

२. माहे मे व जून २०२० या महिन्याचा उर्वरित ५० टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे.

३. माहे जून व जुलै २०२० या महिन्याचे वेतन देय असलेल्या तारखेस देण्यात यावे.

४. एस.टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे.

५. इतर राज्याप्रमाणे प्रवासी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारण्यात यावा.

६. महाराष्ट्र राज्यातील सर्व टोल टॅक्स माफ करण्यात यावे.

७. मोटार वाहन कर माफ करण्यात यावे.

८. डिझेलवरील व्हॅट कर माफ करण्यात यावे.

९.कंत्राटी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अशा एकूण अनेक १५ मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आगार युनिटचे सचिव सत्यवान औरादे, अागार युनिटचे अध्यक्ष माधव साबदे, राज्य उपाध्यक्ष सौ गुट्टे मॅडम, औरंगाबाद विभागाचे विभागीय नेते निसार पठाण, आगाराचे उपाध्यक्ष विष्णू मुंडे, उमेश पोपलायत या सर्वांनी तहसील कार्यालय अहमदपूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here