पातूर तालुका व शहर भाजपा च्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या कृषी विधेयक स्थगीती पत्रकाची होळी करून निषेध करीत तहसीलदारांना निवेदन !

पातूर – निशांत गवई

पंतप्रधान मा.श्री नरेन्द्रजी मोदी यांनी ऐतहासीक कृषी विषयक विधेयक मंजुर करुन शेतकऱ्यांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे.माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केन्द्राने मंजुर केलेल्या कृषी कायद्याच्या अमंलबजावणीस राज्यात स्थगिती दिली आहे.

शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आघाडी सरकाचा निषेध करण्यासाठी आज दिनांक ०७-१०-२०२० रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर येथे महाराष्ट्र सरकारच्या स्थगीती आदेशाची होळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले.

व केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची अमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय राज्य मंत्री मा.संजयभाऊ धोत्रे , जिल्हा अध्यक्ष आ.श्री.रणधीर सावरकर ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.तेजराव थोरात व पातूर तालुका अध्यक्ष श्री.रमण जैन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहर तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले तालुका व शहरातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी,

पदाधिकारी,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,त्यामध्ये श्री.रमण जैन,विजयसिंह गहिलोत ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,अभिजीत गहिलोत ,कपिल खरप ,द्न्यानेश्वर जाधव,सचिन बारोकार ,रामभाऊ गोळे ,श्रीकांत बराटे ,सुरेश मुर्तडकर ,गजानन शेंडे ,मंगेश केकन ,संतोष शेळके ,

अजय लासुरकर ,मिराताई तायडे ,तुळसाबाई गाडगे ,वैशाली निकम ,सपना राऊत,भारती गाडगे ,रेखा गोतरकर ,मंजुषा लोथे ,महेश वैद्य ,अजय गिरी ,सचिन बायस ,शंकर जामोदे ,निशांत बायस ,संदीप तायडे ,किरण निमकंडे ,सुभाष खिल्लारे ,गजानन भोकरे ,अजय राव ,निलेश फुलारी ,शंकर भगत ,शिवकुमार बैस,

विश्वनाथ ताले ,डिगांबर गोतरकर ,सुशील ढोरे ,रमेश राठोड ,ॐकार कोल्हे ,नितीन खंडारे ,राजेश आवटे ,गोकुळदास खंडारे ,निरज कुटे ,निलेश बगळेकर ,दिलीप ईंगळे ,विट्ठल ताले ,रामा शिंदे,अतुल बायस ,संतोष तीवाले ,राजेश निमकाळे ,भारत शिंदे,दतात्रय रामचंद्र,संतोष राठोड व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here