चांदुर बाजार मधे कृषि पदवीधर संघटने तर्फे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन…

शेतकऱ्याला बियाणे बोगस दिले…वेळ गेली पैसा गेला याची भरपाई कोण देणार?

कम्पनी वर गुन्हा दाखल न झाल्यास भगतसिंग मार्गाने आंदोलन करू

चांदुर बाजार – राज्यात व विशेषतः विदर्भातील जिल्ह्यात खासगी कंपनी कडून बोगस बियाणे बाजारात प्रसारित करण्यात आले असे निदर्शनास आले असता चांदुर बाजार तालुक्यातील कृषी पदवीधर संघटनेचे पदाधिकारी यांनी बोगस बियाने शेतकऱ्यांना विक्री करून शेतकऱ्याची मोठी फसवणूक करणाऱ्या कंपनी वर कारवाई करणेबाबद कृषी विभागाला निवेदन देण्यात आले.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर शेतकरी आधीच कर्जात उभा असतांना,खाजगी कंपनीने सोयाबीन बियाणाचे ९३०५ या वाणाचे सोयाबीन तर अन्य पिकाचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यांची पेरणी केली होती पण बियाणाचे उगवण क्षमता कमी असल्यामुळे ती पेरणीस अयोग्य ठरून शेतकरी हवालदिल झाले असून ते वाण भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनि खरेदी केली यात

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत होत असलेली बाब वेळीच महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटना चांदुर बाजार यातील पदाधिकारी यांना समजताच चांदुर बाजार कृषि पदवीधर संघटनेने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तालुका कृषी अधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले ,

सदर निवेदनात बोगस बियाणे बाजारात प्रसारित करणाऱ्या खासगी कंपनी वर शासनाने योग्य कारवाई व शेतकऱ्यांना फसगतीची भरपाई मिळणेबाबत कृषी पदवीधर संघटना चांदुर बाजार च्या वतीने देण्यात आले,


निवेदन देते वेळी कृषी पदवीधर संघटनेचे ऋषभ गावंडे (विदर्भ सोशल मीडिया समन्वयक),गौरव खुळे (जिल्हा संघटक),शुभम वासनकर(ता.अध्यक्ष,चांदुर बाजार),विक्की देशमुख(ता.उपाध्यक्ष,चांदुर बाजार),सुमित घोम(शहर अध्यक्ष),ऋषिकेश वाठ(चांदुर बाजार सदस्य),व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here