कोगनोळी वंचित आघाडीतर्फे निपाणी तहसीलदार यांना निवेदन…

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री…

चालू वर्ष 2021 मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोगनोळी सह तालुक्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती.या पडलेल्या पावसामुळे सकल भागात असणाऱ्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात महापुराचे पाणी शिरले होते.त्याचबरोबर अनेकांच्या घरांची पडझड देखील झाली होती.यासाठी नुकसान भरपाई म्हणून सरकारने विषेश मदत जाहीर केली आहे.

त्याप्रमाणे ग्रामपंचायत पीडीओ आणि नोडल अधिकारी यांच्या देखत महापुर आलेल्या आणि पावसाने घरे कोसळलेल्या घरांचा सर्वे करण्यात आला आहे.पण 2021 साली महापुरामुळे आणि अतिवृष्टीने पडलेल्या घरांची बनावट यादी तयार करून ग्रामपंचायत कोगनोळी कडून कर्नाटक सरकारची दिशाभूल केल्याबदल दि.18 रोजी निपाणी तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोगनोळी ता.निपाणी येथील वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन सादर केले आहे.

संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून यादी तात्काळ रद्द करावी व नव्याने सर्वे करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य लाभार्थ्यांना वगळून आजी , माजी ग्रामपंचायत सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळवून देणे,एकाच घरावर अनेक GPS करणे अशा प्रकारे सरकारी नियमांच उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

यावर तालुका पंचायत मुख्याधिकारी आणि तहसिलदारांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काशीनाथ आवटे,,रामदास ढोबळे, सुधीर माने, महावीर आवटे, सुरेश शिंत्रे, नरजित विटे,दगडू नाईक,विलास कोरवी, निपाणी तालुका संघटक करण कांबळे, आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here