प्रतिनिधी; राहुल मेस्त्री
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे पिडीत 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या व पुरावे नष्ट करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका वंचित बहुजन आघाडी कडून ईस्पुर्ली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.. याबाबत सविस्तर माहिती अशी की.
उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरात 19 वर्षीय पीडितेवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला होता. त्यात पुढे तिची जीभ छाटली तसेच मणक्याचे हाड देखील मोडण्यात आले.बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली होती दिल्ली येथे उपचार सुरू होते ..मात्र तीचा जिव वाचु शकला नाही.. अखेर तिचा मृत्यू झाला.
यातील सर्व नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच तिचा शव अंत्यविधीसाठी घरच्यांना न देता पोलिसांनी परस्पर स्वतः अंत्यविधी केला आणि या घटनेतील सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी
अशा मागणीचे निवेदन पोलीस ठाणे अमंलदार अजित देसाई व पोलीस हवालदार विजय कांबळे यांना दिले.याप्रसंगी सचिन कदम , देवेंद्र कांबळे,सर्वेश कांबळे,अक्षय कांबळे. प्रणव कांबळे .आदी उपस्थित होते..