ओबीसी चे आरक्षण रद्द होण्यास भाजपा सरकार कारणीभुत, ओबीसी आरक्षणाचा संदर्भात मा.विभागीय आयुक्तांना निवेदन…

नागपूर – शरद नागदेवे

मंगळवार दि.२९ जुन २०२१ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष श्री.दुनेश्वर पेठे व ग्रामीण अध्यक्ष श्री.बाबा गुजर यांच्या नेतृत्वात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.ईश्वर बाळबुधे व प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात शिष्टमंडळाने विभागीय आयुक्ता मा. प्राजक्ता वर्मां सोबत चर्चा करुन त्यांना निवेदन सादर केले.

सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने ओबीसीचे २७% राजकीय आरक्षण जनगणनेचा ईम्पीरीकल डाटा सादर न केल्यामुळे रद्द झाले आहे. २४ एप्रील १९९४ रोजी तात्कालीन मुख्यमंत्री मा.शरदराव पवार व मा.ना.छगनजी भुजबळ यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात मंडल आयोग लागु झाला व राज्यात २७% आरक्षण लागु झाले. जवळपास ६८००० जागा आरक्षीत झाल्या होत्या.

मात्र आता हे आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालीका, महानगरपालीका निवडणुकीत याचा फटका ओबीसी समाजाला बसणार आहे.राज्यशासनाने अनेकवेळा विनंती करुन सुध्दा भाजपा शासीत केंद्र सरकारने २०११ साली जनगणनेच्या आधारे तयार झालेला इंपीरिकल डाटा राज्य शासनास पुरविला नाही.परिणामी न्यायालयात ओबीसींची आकडेवारी सादर न झाल्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले.

याला जबाबदार संपुर्ण भाजपा सरकार असुन ओबीसी समाजावर हे अन्याय करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला आहे.करीता केंद्र शासनाने २०११ च्या झालेल्या जनगणनेनुसार मतदार संघ निहाय ओबीसीची आकडेवारी राज्य शासनास सादर करावी तसेच २०२१ साली होणा-या जणगणनेत ओबीसीची पण जनगणना करावी व राज्यशासनाने त्वरीत ओबीसी आयोग नेमुण हा प्रश्नसोडवावा .जोपर्यंत आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेवु नये, अशी मागणी मा. विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केलेली आहे.

शिष्टमंडळात वर्षा शामकुले, जानबा मस्के, अविनाश गोतमारे, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, रिज़वान अंसारी, महेंद्र भांगे, रविंद्र इटकेलवार, शैलेश पांडे, संतोष सिंह, रविनीश पांडे, रूद्र धाकड़े, सतीश इटकेलवार, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, अॅड. नितिन देशमुख, बबीता मेहर, सुनील लांजेवार, स्वाति कुंभलकर, धर्मेंद्र खमेले, वीरेंद्र निखार, अनिल बोकड़े, प्रणय जांभूलकर, राजेश अधव, जया देशमुख,

मनीषा तुमसरे, डॉ. अनिल ठाकरे, बापू चरड़े, अॅड. सुनील लाचरवार, आशीष सेलूकर, बंडू घोड़मारे, सैयद सुफियान, अनमोल मुदलियार, शनि अंसारी, हेमंत चोरमार, नरेंद्र साळवे, सुनीता खत्री, दिनेश साळवे, अर्जुन सिंह राणा, जावेद खान, जुबेर कबीर, विश्वजीत साबळिया, आयुष लोनारे, शुभम पंडित पवार, ज्योति लिंग्यात, संजय आवळे, बबीता सोमकुवर, मन्दा मेश्राम इ अनेक कार्यकर्ता सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here