डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अकोला वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन…

व्याळा:- गेल्या ९ ते १० महिन्या पासून विभागीय उपसंचालक भुमी अभिलेख अमरावती हे पद रिक्त आहे आणि या पदाचा प्रभारी कारभार जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख अकोला श्री.शिरोडकर यांच्या कडे आहे पदा कारभार देत असतांनी जमाव बंदी आयुक्त पुणे यांनी त्यांना अधिकार दिले नाहीत

त्यामुळे अमरावती विभागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांचे कामे थांबले आहेत विभागातील भुमी अभिलेख, नझुल, मधील सर्व लोकांचे कामे झाली पाहिजेत या करिता या पदावर पुर्णवेळ अधिकारी द्या किंवा प्रभारी असलेले जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख अकोला यांना लोकांचे कामे करण्याचे अधिकार द्या

अशा मागणीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अकोला वतीने महाराष्ट्र राज्यांचे मुख्य सचिव श्री.सिताराम कुटे यांना अकोला जिल्हाधिकारी कार्यालया मार्फेत निवेदन सादर करण्यात आले…जिल्हा अध्यक्ष उज्ज्वल अंभोरे, रंजीत सरदार, दिनेश खोब्रागडे,संघपाल वानखडे, रमेश काळबागे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here