राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने निवेदन…

मुंबई – गणेश तळेकर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा, तसेच मुंबई, पुण्यात, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये कलाकारांसाठी कलाकार भवन उभं करावं,

ज्येष्ठ कलाकारांचे मानधन तीन हजार आहेत ते साधारण 15 हजार रुपये महिना असे करावे, तसेच राज्यातील चित्रपट गृहांचा जो स्थानिक मालमत्ता कर आहे व लाईट बिल आहे यात ते कर माफ करावे किंवा त्याच्यामध्ये सूट द्यावी,

व सिडको आणि म्हाडा येथे राखीव कोट्यातून कलाकारांना घरे मिळावी अशा मागण्या अजितदादांना देण्यात आल्या, दादांनी त्याच्या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रमुख सचिवांशी बोलून त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे आदेश दिले.

निवेदन देताना राज्य समन्वयक संतोष साखरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्याताई म्हात्रे….. खूप खूप धन्यवाद अजित दादा बोले तैसा चाले असे आमचे दादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here