न्यु तोतलाडोह, रयतवाडीवासीयांचे दारूबंदीसाठी ठाणेदारास निवेदन…

दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करून शांतता निर्माण करण्याचे ठाणेदाराचे आश्वासन…

देवलापार – शनिवार दि.७ ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या २ किमी अंतरावरील न्यु तोतलाडोह,रयतवाडी येथील गावकऱ्यांनी गावात अवैधरित्या सुरू असलेले दारूचे धंदे बंद करून गावात शांतता निर्माण करावी यासाठी मानवाधिकार समितीचे नरेश जैन यांच्या नेतृत्वात देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांना एक निवेदन दिले.

या गावात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यामुळे गावातील शांतता भंग पावली असून गावात भांडण तंटे होणे नित्याचीच बाब होवून बसली आहेे. यामुळे गावातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले.आता तर लहान मुले ही दारूच्या आहारी जात आहेत.

त्यामुळे शेवटी कंटाळून गावकऱ्यांनी आज थेट पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांना भेटून गावातील अवैधपणे सुरू असलेल्या दारू धंद्याविषयी माहिती दिली. यावेळी ठाणेदार बोरकुटे यांनी गावकर्यांना आश्वस्त करून गावातील दारूचे धंदे बंद करण्यासाठी पोलीस सर्वोतोपरी मदत करेल पण आपले सहकार्य असल्याशिवाय हे शक्य होणार नाही.

त्या साठी गावात सभा घेवून दारू बंदी समिती गठीत करू.तसेच गावात पोलिसांची पण गस्त वाढविण्याचा मानस ठाणेदारांनी बोलून दाखवला.तसेच गावातील दारू विक्रेत्यांची ओळख करून त्यांना ठाण्यात बोलावून दारू बंद करण्यासाठी सांगितले जाईल.व यानंतर ही त्यांनी दारूचे धंदे बंद केले नाही तर त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here