कोगनोळी ग्रामपंचायतीला उत्तम पाटील गटाच्या ग्रा.पं.सदस्याचे निवेदन…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील गावातील विविध भागात रस्त्यावरच कचरा असल्याचे निदर्शनास येत असुन सदर कचरा व कोगनोळी गावामधील सर्व गटारी स्वच्छ करण्याबाबत यासह इतर मागणीचे निवेदन निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील गटाचे ग्रा.पं.सदस्य सुजित माने,मनिषा परीट आणि शोभा मानगावे यांच्या वतीने कोगनोळी ग्रामपंचायत पीडीओ दिलिप जाधव यांना देण्यात आले…

गेल्या अनेक दिवसांपासून गावातील विविध भागातील रस्त्यावरील दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळत असुन येथील सर्व भागातील गटार देखील अस्वच्छ आहेत.येणाऱ्या काही दिवसात पावसाचे दिवस सुरू होणार आहेत.

त्यामुळे तुंबलेल्या गटारीमुळे अनेकांच्या घरात पाणी जाऊ शकते.त्याचबरोबर कचरा उचलनेण्यासाठी असणाऱ्या घंटागाडीची वेळ सकाळी आणि संध्याकाळी नियोजन करावे. घंटागाडीचे नियोजन नसल्याने रिकामीच घंटागाडी फिरत असल्याने होणारे आर्थिक नुकसान थांबवावे,कचरा जमा करण्यासाठी शासनाकडून आलेले बकेट घरोघरी वितरण करावे अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्या मनिषा परीट म्हणाल्या वरील सर्व मागण्या प्रत्येक महिन्याच्या बैठकीत आमच्या कडून विचारले जातात .पण अश्वासनाशिवाय काहीही सांगितले जात नाही.म्हणून या मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने निदर्शने करु असे सांगितले.

त्यामुळे ग्रामपंचायत याला किती गंभीरतेने पाहते हे पाहणे महत्त्वाचे आहे.का या निवेदनाला केराची टपली दाखवणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे…यावेळी ग्रामपंचायत पीडीओ यांनी सदर मागणीवर बैठकीत चर्चा करु असे अश्वासन दिले. याप्रसंगी विजय जाधव,सचिन परीट,निलेश मगदूम ,सुनील काशीद गंगाराम चकाटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here