महापुरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई करिता वंचितचे निवेदन…

पातूर – निशांत गवई

महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरीक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांना सरकारतर्फे तातडीने मदत व पूर्नवसन आवश्यक आहे.जुलै २०२१ मध्ये या वर्षी दोन दिवसांमध्ये साधारण १६०० मि.मि. इतका पाऊस पडला म्हणजे वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या किमान ९०% पाऊस पडला म्हणजे वर्षभरात पुरामुळे होणाऱ्या नुकसान हे फक्त मागील एक आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर झाले, त्यामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून जाणे आणि उभी पिके सुध्दा वाहून गेली,असे विदारक चित्र आपल्या समोर आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात आता अक्षरश दगड गोटे शिल्लक राहिली आहेत. पशुधन देखील मृतपाय झाले आहे.आता सदरची शेती नव्याने करण्या योग्य जमीन बनवण्यासाठी शेतात बाहेरून माती विकत आणून त्यांना शेती करावी लागेल अशी परिस्थिती आहे. विशेषतः भूमिहीन, मागासवर्गीय अल्पभूधारक यात सर्वाधिक भरडल्या गेले, लहान बालक आणि महिलांच्या अडचणींची मोजदाद देखील नाही.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भात अतोनात नुकसान झाले आहे. शेतातला उभा ऊस अक्षरश: जमीनदोस्त झाला आहे.त्यामुळे संबधित शेतकरी हा ज्या साखर कारखान्याचा सभासद व करारधारक शेतकरी आहे त्या साखर कारखान्याने मागील वर्षीच्या बीलच्या प्रमाणात शेतकऱ्यांना ऊसाची मूल्य भरपाई द्यावी तशी तरतूद महाराष्ट्र शासनाने कारखानदारांना करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढावा.

त्याशिवाय त्या कारखान्यांना ऊस गाळपासाठी परवानगी देऊ नये.त्याचप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातून निर्माण झालेले अनेक उपपदार्थ निर्मिती,सहऊर्जा प्रकल्प,मळी स्पिरीट उत्पादन ऑक्सिजन प्लांट, सॅनिटीझर प्लांट यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. कापूस,सोयाबीन आणि डाळ, व फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानी बाबत सरकारने पिकांची जाहीर केलेली एफआरपी आणि एम एस पी घाऊक तसेच किरकोळ बाजारात असलेली धान्याची आणि पिकाची किंमत मूल्यधारीत करून संबंधीत शेतकऱ्याला पिकांची आणि उत्पादनाची किंमत मदत म्हणून करावी.

महापुरात झालेल्या नुकसानी बाबत सरकार सरकारी निकषानुसार केली जाणारी मदत तुटपुंजी आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या एकरी उत्पादन होणाऱ्या पिकाचे बाजारी मूल्य भरपाई म्हणून शेतकऱ्याला मिळावे. नुकसानीमुळे दुबार पेरणी करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावा प्रमाणे झालेल्या नुकसान भरपाईची मदत करावी. या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने आज दि.5/08/2021 रोजी तहसीलदार पातूर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पातूर ता.अध्यक्ष निर्भय पोहरे,वंचित बहुजन महिला आघाडीचे पातूर ता.अध्यक्षा अलकाताई सदार,ता.प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सुरवाडे, सौ.सुनीता अर्जुन टप्पे(मा. पं.स.सदस्या),सौ.अर्चनाताई डाबेराव(पं.स.सदस्या),साधनाताई धाडसे(महासचिव महिला आघाडी),अनिल राठोड,करुणाताई गवई(शहर अध्यक्षा),सौ.दीपाली पोहरे(शहर उपाध्यक्षा)विजय बोरकर,निलेश सोनोने,ऍड. किरण सरदार,कुणाल सरदार,नागेश करवते,राजेंद्र इंगळे,रमेश कदम,निहार घुगे,निलेश सिरसाट,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here