कोगनोळी येथील व्यवसायिक आणि शेतकरऱ्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्याच्यांकडे निवेदन…सहापदरी मार्ग सोडून इतर प्रकल्पाला विरोध…

राहुल मेस्त्री

पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार बेळगाव ते कर्नाटक सिमेवरील कोगनोळी गावापर्यंत सहा पदरी रस्त्याचा सर्वे करण्यात आला आहे.मात्र कोगनोळी ता.निपाणी येथे सहापदरी रस्ता सोडून अनखी काही एकर नवीन प्रकल्पासाठी जमिनीचा सर्वे करण्यात आला आहे.म्हणून कोगनोळी महामार्गा नजिकच्या सहापदरी रस्त्याची जमीन सोडून इतर जमीन महामार्गाला देऊ नये आशा.

मागणीचे निवेदन ग्रामपंचायत,तहसीलदार,प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी ते थे निपाणी विधानसभा मतदार संघाच्या आमदार आणि कँबिनेट मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे सहापदरी महामार्ग सोडून जादा भुखंड संपादन करु नये या मागणीचे निवेदन शेतकरी व व्यावसायिक यांच्या मार्फत देण्यात आले आहे.यावर जोल्ले दांपत्याने संबंधित अधिकारी आणि शेतकरी यांची चर्चा घडवून आणु असे अश्वासन दिले आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षा या प्रकल्पामुळे कोगनोळी ता.निपाणी येथील कर्नाटक सिमेवरील अनेक शेतकरी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असे बोलले जाते.या होणाऱ्या सहापदरी रस्त्याला आपला विरोध नसुन इतर मोठ्या प्रकल्पाला आपला विरोध आहे.असे मत शेतकरी व व्यावसायिक यांचे आहे.तर हा प्रकल्प येथून काही अंतरावर शासनाच्या गायरान जमीनीवर करावा अशीही मागणी होत आहे.

जर यातून सरकारने न्याय नाही दिला तर याठिकाणी मोठे आंदोलन छेडु असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजु पवार यांनी दिला आहे.या प्रकरणात अधिकाऱ्याच्याकडे शेतकऱ्यांची सातत्याने बाजू राजु पवार मांडत असुन येथील शेतकरी व व्यावसायिकांना याआधीच पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here