राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्ती करण्यासाठी दिले निवेदन…

राजू कापसे, रामटेक –

महाराष्र्ट राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर निवड करावी या मागणीचे निवेदन नागपुर जिल्हा (ग्रामिण)व तालुका म. राज्य पत्रकार संघाद्वारे तहसिलदार बाळासाहेब मस्के यांचेमार्फत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचेकडे पाठवण्यात आले.


उत्कृृष्ट वाकपटू,राज्याचा छत्रपती पुरस्कार प्राप्त ,पत्रकारांच्या हक्कासाठी ,पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मागणी लावून धरून मंजुर करून घेणारे,पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा कवच मिळवून देणारे ,

राज्य पत्रकार संघाची मुलुख मैदान तोफ राज्य संघटक संजय भोकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्ती करावी अशी मागणी म,रा.पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ सरचिटणीस शरद नागदिवे यांचे नेतृत्वात प्रसिद्धीप्रमुख कैलास निघोट,

नागपुर ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष वसंत डामरे,जि.प्रसिद्धीप्रमुख अशोक सारंगपुरे, तालुकाध्यक्ष अनिल वाघमारे,महासचिव (देवलापार) रामरतन गजभिये,उपाध्यक्ष मुकेश तिवारी,तालुका उपाध्यक्ष राजुभाऊ कापसे,राहूल पिपरोदे,सचिव आकाश सहारे,अमोल खडोतकर,जगदिश सांगोडे,रूपेश वनवे,रितेश बिरणवार,सुनिल कोल्हे यांनी तहसिलदार बाळासाहेब मस्के यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांचेकडे पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here