बोदवड तहसीलदार यांना डॉ कलाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलें निवेदन…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ च्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणेसाठी आर्थिक,व शैक्षणिक विकासासाठी,विविध प्रकारच्या कर्ज योजना व्यवसाय परीक्षण व इतर योजना राबविण्यासाठी सन 2000 मध्ये मौलाना आझाद। अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले परंतु काही वर्षांपासून अंमलबजावणी होत नाही म्हणून समाजातील जागृत नागरिकांनी तहसीलदार हेमंत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले,

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ चे अधिक सक्षमीकरण करून त्या माध्यमातून अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या सर्व योजनांची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, महामंडळ चे प्राधिकृत भागभांडवल 1500 कोटी रुपये पर्यंत वाढविण्यात यावे,

शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत(कर्ज स्वरूपात)अडीच लाख रुपये ऐवजी 15 लाख रुपये करण्यात यावी तसेच उत्पन्न मर्यादा 10 लाख रुपये पर्यंत करण्यात यावी, परत फेड मुदत 8 वर्ष करण्यात यावी, कर भरणाऱ्या जमीनदाराची अट रद्द करण्यात यावी,

लघु उद्योग व छोटे मोठे व्यवसाय”उन्नती मुदत कर्ज योजना”कर्ज रक्कम 50लाख रुपये पर्यंत वाढविन्यायत यावी,उत्पन्न मर्यादाअट शहरी भागासाठी2.50ऐवजी 10लाख रुपये पर्यंत करून परतफेड मुदत 5वर्षे ऐवजी7 वर्षकरण्यात यावी, महिलांना सक्षम करण्यासाठी “सूक्ष्म पत पुरवठायोजना”अंतर्गत बचतगट ना2 लाख ऐवजी 5 लाख रुपये करण्यात येऊन परतफेडीचा कालावधी36 महिण्याऐवजी 48 महिने करण्यात यावा,

“थेट कर्ज योजना”सुरु करुन कर्ज मर्यादा 1.50 लाखा पर्यंत वाढविण्यात यावी,पात्र अर्जदाराचे अर्ज ऐका महिन्याच्या आत निकाली काढून रक्कम त्यांच्या बँकखत्यातजमा करावी,राज्यातील सर्व कार्यालय सुरु करुन प्रत्येक कार्यालयात दोन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे यात हलगर्जीपणा करणाऱ्या व पैसे ची मागणी करनाऱ्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,

महामंडळावर संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी, निवेदनावर मुंतजीर अहेमद आखलाक अहेमद पटवे, आदिलखान राफीकखानं ,साबीर शेख हारून ,शेख ईनुस शेख मुसा,सय्यद नइ म सय्यद हनिफ ,शे जाफर शे अल्ताफ,फारूक शे मूनाफ, नाईम खान युसूफ खान,बागवान, हाफिज फिरोज पिंजारी,मौलवी अमीन पटेल,समीर जमील शेख,इत्यादीच्या साह्य आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here