राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्य रितीने काम करत असल्याचा,शिवसेना खासदार राजेंद्र गाविता कडून गंभीर आरोप…

विनायक पवार- पालघर

राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद वेळी मंत्री थोरांतावर घाणघाती व गंभीर आरोप केले.

पालघर : महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा आहे. तरीही राज्यात मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींवर होत आहेत. या सर्व गोष्टींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात परवानगी देत असल्याचा गंभीर,आरोप पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात सद्याच्या केलात आदिवासींच्या जमिनीची खरेदी विक्री होत असल्याचा आरोप गावीत यांनी केला आहे.

महसूल खात्याकडून घटनाबाह्य रित्या सरसकट परवानग्या
“मुंबई, ठाणे, पनवेल पालघर भागात देत आहेत
जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या जमिनींची मागणी वाढली असून यामध्ये. महसूल मंत्री थोरात घटनाबाह्यरितीने काम करत असल्याचा आरोप गावीत यांनी केला आहे.

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या.”

“मात्र आता महसूल खात्याकडून सरसकट परवानगी देत असल्याचा आरोप गावित यांनी केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करुन योग्य ती करवाई करावी,” अशी मागणी राजेंद्र गावित यांनी केली असून
आता महाविकास आगाडी मधील मंत्री थोरात यांच्या वर्ती शिवसेना खासदार यांनी गंभीर आरोप केल्याने शिवसेना ,कांग्रेस यांच्यात वाद जुंपलेला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here