मूर्तिजापुर | राज्य शासनाच्या वाहनाने दुचाकीला उडविले…दोन महिला गंभीर जखमी…

मूर्तिजापुर ते अकोला पळसो बढे मार्गावर कौलखेड़ जहाँगीर फाट्या जवळ महाराष्ट्र राज्य शासनाच्या टाटा सुमो आणि दुचाकीचा अपघात झाला असून यात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे.

अकोला येथून मूर्तिजापुर कडे येणारी राज्य शासनाच्या टाटा सुमो MH.30 H.289 या गाडीने कौलखेड जहांगीर फाट्याच्या जवळपास समोरून येणाऱ्या अक्टीव्हा क्रमांक MH.30B K5825 ला उडविले. काल सायंकाळी 4,30 दरम्यान ची घटना

या अपघातात दुचाकीवर दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. १) माधुरी राहुल पवार २) सोनी मंगेश पवार असे या महिलांचे नाव असून दोघही मूर्तिज़ापुर येथील रहिवाशी असल्याचे समजते. त्यांना पुढील उपचार अकोला येथे रवाना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here