तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे

अन्यथा शेतकऱ्यांसहित रास्ता रोको आंदोलन छेडणार

गोकुळ हिंगणकर
तेल्हारा प्रतिनिधी

तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्ते तेल्हारा ते आडसुळ, तेल्हारा ते हिवरखेड, तेल्हारा ते वरवट रस्ता गेल्या काही वर्षा पासुन खोदून ठेवलेले व तसेच या रस्त्यावर पिवळी माती टाकलेली आहे. सुरुवातीला या धुळी मुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बराच त्रास झाला. असून सदर रस्त्यावर आता पर्यंत कित्येक अपघात झाले आहे.तर काहींना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.

तरी या मुख्य रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेता सध्या पावसाला सुरुवात झाली असून पिवळ्या मातीमुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यामुळे गेले कित्येक दुचाकीस्वार पडले असून त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे . तसेच या मुख्य रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची शेती असून शेतकऱ्यांना या रस्त्याने दररोज ये-जा करावी लागते याचा त्रास कित्येक शेतकऱ्यांना होत आहे.

तरीही संबंधित बाब लक्षात घेता त्वरित उपाय योजना न केल्यास संबंधित प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय राहणार नाही,असे सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे यांनी शेतकऱ्यांन समक्ष संबंधित प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. जर सात दिवसाच्या आत काही उपयोजना न केल्यास शेतकऱ्यांनसहित कोरोना संकटाला न जुमानता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जवाबदारी संबंधीत प्रशासनाची राहिल याची दक्षता घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

व प्रतिलिपीत मा. उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,तेल्हारा तहसीलदार साहेब, तेल्हारा मा ठाणेदार साहेब,तेल्हारा
यांना देण्यात आली. त्यावेळी सदर निवेदनावर विनोद सगणे, विलास बेलाडकर, गुरुदेव ईसमोरे, आनंद बोडदे,बाळकृष्ण दामोदर,शिवाजी चिकटे,अमर भारसाकळे,हिम्मत पोहरकार,सदानंद मोरे,भानुदास शिवणकर,चिंतामण गवारगुरु,राजेश शर्मा,पंजाबराव मोहोड,प्रकाश सोळंके, व इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here