वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पद भरती तात्काळ सुरु करा…!

अहमदपूर – बालाजी तोरणे

सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीची मागणी..!

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार व राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठातील लक्षणीय रिक्त प्राध्यापक पदांची संख्या लक्षात घेऊन ती तात्काळ भरण्यात यावीत अशी आग्रही मागणी सेट-नेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे देण्यात आले.

येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीवर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे राज्यातीय उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे. विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी, परीक्षा मुल्यामापानासाठी व इतर कामांसाठी महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध नसल्यामुळे त्याचा उच्च शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी विपरीत परिणाम होत आहे.

तसेच राज्यातील सेट,नेट पीएच.डी. पात्राताधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पात्रताधारक मोठ्या मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे बंद प्राध्यापक पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरु होणे आवश्यक आहे.

सेट-नेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्यावतीने याबाबत “मिशन निवेदन” हा कार्यक्रम सुरु केला असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदांची १००% तात्काळ भरती करण्यात यावी,

प्रचलित तासिका तत्त्व धोरण बंद करावे अथवा १००% पदांची भरती होईपर्यंत तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या प्राध्यापकांस “समान काम समान वेतन” या तत्वानुसार वेतन देऊन त्यांच्या सेवा ग्राह्या धरण्यात यावी, विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या निर्णयानुसार वरिष्ठ महाविद्यालये पद भरती प्रक्रियेसाठी २०० बिंदू नियमावलीची अंमलबजावणी करण्यात यावी आदी प्रमुख मागण्या नमूद केल्या आहेत.

सदरील निवेदनावर अहमदपूर समन्वयक डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी,प्रा.मदने जे.टी.,प्रा.बिरादार के.डी,प्रा.हरी जाधव,प्रा.महेश लांडगे,प्रा.माधव कबीर,प्रा.दिगांबर मोगले,प्रा.अमोल वाघमारे,प्रा.शिवाजी हेंगणे,प्रा.राहूल तिगोटे आदींचे नांवे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here