आधारभूत धान खरेदी केंद्रावरती तातळीने धान खरेदी सुरु करा अन्यथा प्रहार करणार जिल्हाभर उग्र आंदोलन…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हा हा तांदुळाच्या जिल्हा म्हणुन प्रख्यात आहे, भारत हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो, मात्र शेतकऱ्याच्या समस्यांना वाचा फोडण्यास जन प्रतिनिधींना पुढाऱ्यांना वेळ नाही.

गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पुढाऱ्यांना उदघाटनाची लईच घाई, शेतकऱ्यांचा एकही दाना धान खरेदी केंद्राने घेतला नाही मग जनप्रतिनिधी, पुढाऱ्यांच्या आवाज मात्र का म्हणून शेतकऱ्यांचा हितासाठी ऐकू येत नाही.

बहुतेक धान खरेदी केंद्र हे पुढाऱ्यांचेच आहेत, फेडरेशन व केंद्र चालक हे दर वर्षी गोरगरीब शेतकऱ्यांना वेळेत केंद्र सुरू न करता व्यापारी वर्गाकडे धान कमीत कमी किंमतीत वळते करण्यास, विक्री करण्यास भाग पाडतात यावार कधीही गोंदिया जिल्ह्याचे विकासाच्या पेरू मानल्या जाणाऱ्या मोठ्या पुढाऱ्यांना, भूमिपुत्र मानून घेणाऱ्या भूमी पुत्राला शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्यास वेळ नाही,

धडक सिंचन विहरींचे पैसे शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून मिळाले नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आत्महत्येची वेळ आली तरीसुद्धा त्यावर बोलण्यास वेळ नाही, शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले त्यावर बोलण्यास वेळ नाही, रोड रस्ते नाले, धान खरेदी केंद्र यांच्या उदघाटनास वेळ आहे मात्र तिथे होणारी शेतकऱ्यांची लूट, यावर बोलण्यास वेळ नाही.

भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थेवर गुन्हे दाखल करून न्याय मिळावून देण्यास वेळ नाही, सामाजिक कार्यकर्ता यांनी खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची आवाज उठवल्यास उलट त्यांच्या वरती एट्रासिटी सारखे खोटे गुन्हे दाखल झाले लूट कागदावर सिद्ध झाली जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले गुन्हे दाखल करा संस्थेची परवानगी रद्द करा मात्र संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल न करता संबंधित प्रशासन, शासन यांची मिलीभगत असल्याने तसे न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळाला नाही यावर कोणीही पुढारी जनप्रतिनिधी पुढाकार घेत नाही.

संस्थांना पांढऱ्या चे काळे आणि काळ्या चे पांढरे फेडरेशन व पुढाऱ्यांच्या मिलीभगत करून सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्यात येते मात्र त्यावर प्रतिकार करण्यास बोलण्यास वेळ नाही, शेतकऱ्यांचे धान शेतात पडून डुकरे खातात शेतकऱ्यांचे नुकसान होत असूनही एकही जन प्रतिनिधी पुढारी केंद्रावर धान खरेदी सुरु करण्यास बोलत नाही.

तरीही म्हणतात गोंदिया जिल्ह्यातील विकासाचे महापेरू, व भूमिपुत्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे आहो, गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधून राजकारणाची रोटी शेकणारे हे जनप्रतिनिधी पुढारी आहेत हे आता सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना दिसून आले आहे.

स्वतःला शेतकरी सर्वसामान्य गोर गरिबांचे हितेशी माणवून घेतात भोळ्या भावळ्या जनतेला शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनात फसवतात असा भोपोंजी पणा आता चालणार नाही, असा घनघणीत आरोप व खोचक टोला ही पुढाऱ्यांना जन प्रतिनिधींना नाव न घेता प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे.

धान खरेदी केंद्रावरती तातळीने शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे सुरू न झाल्यास प्रहार तिरोडा तालुक्यात व संपूर्ण गोंदिया जिल्हाभर उग्र आंदोलन करेल अशी ताकीदही निवेदनाद्वारे तहसिलदार तिरोडा यांना प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रदिप निशाने, प्रहार कार्यकर्ता तिलक पारधी, गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, प्रहार कार्यकर्ता सुरेंद्र सूर्यवंशी, वामन हजारे यांनी दिली.

तसेच धान खरेदी केंद्रावर वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक वजन काटे आठवड्यातून चेकिंग करण्यात यावी, सहकारी संस्था तलाठी यांच्याशी साठगाठ करून खोटे सात/बारा तयार करुन त्या नावावर धान्य विक्री करून शासनाला करोडो रुपये ने लुबाडणूक केली जाते. याची 5 वर्षा पूर्वीपासून ते आता पर्यंतची भोंगळ संस्थांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल व संस्थेचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी गोंदिया प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here