रामटेक – राजु कापसे
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) यांच्या कडुन मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोना मुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अतिशय शैक्षणिक नुकसान झालं आहे.
त्यातच कोरोना आपल्या नवनवीन रुपात बदल होऊन पुन्हा येत असल्याने नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक संस्था शासनाने बंद केल्या पण दुसरीकडे कोचिंग क्लासेस , दुकाने , प्रवास , निवडणुका , हॉटेल , बार सर्वच सुरू आहे. मग प्रश्न येतो की इतर क्षेत्रातील नुकसान भरून काढता येणार नाही असं शासनाला वाटत पण शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून काढता येईल का ?
कोरोनाच्या नावाखाली शासनाने विद्यार्थ्यांचा भवितव्याशी खेळणे बंद करून कोरोना नियमांचे पालन करून राज्यातील शैक्षणिक संस्था त्वरित सुरू कराव्या अशी विनंती एस.एफ.आय संघटनेचा वतीने अमित हटवार , संदेश रामटेके , संदेश मेश्राम , राम येलके सह अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.