बाभळी येथे लसीकरण केंद्र सुरू करा…

तसेच तालुक्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहा

जिजाई प्रतिष्ठानची तहसीलदारांकडे मागणी…

दर्यापुर :अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे .दररोज 800 ते 900 कोरोना पॉझिटिव पेशंट आपल्या जिल्ह्यामध्ये निघत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी तूफान गर्दी असल्यामुळे नागरिकांच्या

मनात शंका-कुशंका निर्माण होत आहे .तसेच या गर्दीमध्ये आपल्यालासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .म्हणून जिजाई प्रतिष्ठान च्या वतीने तसेच बाबळी तील गावकरी मंडळी यांच्यावतीने आज तहसीलदार यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे .निवेदन देतेवेळी उपस्थित विनय गावंडे राजेश पाटील

वाकोडे अनंतराव गावंडे सुभाष भाऊ सोरमारे दिपकराव पारोदे पुरुषोत्तम धोत्रे गोपाल सौदागरे विकी होले राहुल भुभर सागर शेळके आकाश नारोलकार गणेश साबळे अजय बनारसे अंकुश क्षीरसागर अंकुश ठाकरे योगेश रोंघे प्रसन्न इसानेआदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here