आज मध्यरात्री पासून राज्यात एस.टी.कर्मचारी बेमुदत संपावर जाणार – आम.गोपिचंद पडळकरांचा संपास पाठिंबा…

सांगली – ज्योती मोरे

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि एसटीचे विलीनीकरण राज्य सरकार मध्ये करावं या मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून राज्यातले सुमारे एक लाख 20 हजार कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असून, याला आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.

सरकारनं कोणताही निर्णय न घेता या कर्मचाऱ्यांवर जर काही कारवाई केली तर, मी स्वतः परिवहन मंत्र्यांच्या दालनात ठाण मांडून बसणार असून, या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील एस.टी. कर्मचारी आपल्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून, त्यातून येणाऱ्या पैशातून तेल टाकून, या बसेस मुंबईत मंत्रालय आणि परिसरात सोडून देतील. असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here