एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सांगली येथे आज विश्वगामी पत्रकार संघाचा पाठिंबा…

सांगली – ज्योती मोरे

११ नोव्हेंबर पासुन विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सर्व वाहक,चालक व इतर वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वर्षानुवर्षे तुटपुंज्या पगारामध्ये काम करावे लागत आहे.

संध्या महागाईचा विचार केला तर मुलांचे शिक्षण,दवाखाना,घरखर्च हे मिळणाऱ्या तोकड्या वेतनामध्ये भागवणे शक्य होत नाही.म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या एस.टी.डेपोतील वाहक चालक हे आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत.

आणि ही बाब विचार करायला लावणारी व निषेधार्थ आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली जिल्ह्यातील सर्व डेपो मधील वाहक चालक व इतर विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी जो बेमुदत संप सुरु केलेला आहे.

त्यांची प्रमुख मागणी अशी आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीस बेमुदत आंदोलनास आज विश्वगामी पत्रकार संघाकडून पाठिंबा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here