विक्रमगड जव्हार रस्त्यावर एसटीची दोन दुचाकींना धडक, तीन दुचाकीस्वार जखमी दुचाकींचा चक्काचूर…

मनोर – विक्रमगड-जव्हार रस्त्यावरील कासट वाडीच्या वळणावर रविवारी (ता.13)दुपारी दोन वाजताच्या सुमारास एसटी चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बसने दोन दुचाकींचा धडक दिली.या अपघातात तीन दुचाकीस्वार जखमी झाले असून दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.जखमींना जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जव्हार शहरापासून सात किलोमीटर किमी अंतरावरील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या कासटवाडीला रविवारी दुपारी वाड्या वरून जव्हारला जात असलेल्या बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.यात एसटी बसने समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली.या अपघातात योगेश वावटे (वय.20) सीताराम हांडवा (वय.25)आणि मोनाली बार्शी (वय.18)हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

यात पहिली दुचाकी एसटीच्या पुढच्या टायरखाली आल्याने दुचाकी वरील दोघा पैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे.दुसरी दुचाकी एसटीच्या मागच्या टायरखाली आल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत.तिघांनाही जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात दोन्ही दुचाकींचा वचक्काचूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here