सांगली-मिरज आगारातील एस.टी कर्मचारी विलीनीकरण मुद्द्यावर ठाम…

सांगली – ज्योती मोरे

गेले २५ दिवस झाले एस.टी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे.विविध मागण्या आणि राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एस.टी कर्मचारी दिवस रात्र लढत आहेत.परिवहन मंत्री अनिल परब यांनी १ ते १० वर्षं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ, १० ते २० वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ तर २० वर्षच्या पुढे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५०० हजार पगारवाढ देणार असल्याचे पत्रकार परिषद मध्ये अनिल परब यांनी सांगितले होते.

पण एस.टी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचा हा निर्णय मान्य नाही.एस.टी कर्मचाऱ्यांना फक्त राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे ही एकच मागणी आहे.आज सांगली आणि मिरज येथे अजूनही आज एस.टी कर्मचाऱ्यांचा संपाचा २५ वा दिवस असून आज अखेर एस.टी कर्मचाऱ्यांना फक्त राज्य शासनामध्ये विलीनीकरण ह्याच मुद्दावर कर्मचारी आजही ठाम आहेत.

जो पर्यंत परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रेस नोट काढत नाहीत की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण हे महाराष्ट्र राज्य शासनामध्ये केले आहे तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवू असे कर्मचारी बोलत होते.

आमच्या एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये हे सरकार फूट पाडत आहे.कर्मचाराना भडकावून हे सरकार आपल्या बाजूने करुन घेऊन कर्मचाऱ्यांना धमक्या देत आहे.राज्य शासन‌ हे आमच्या एस.टी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून कामावर रुजू व्हा नाहीतर तुम्हाला कामावरून काढून टाकू.तरी सुध्दा एस.टी कर्मचारी हे आपल्या विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम आहोत.

विलिनीकरण हा विषय राज्य सरकार ला मान्य झाला पाहिजे.जरी आमच्या कामगारांमध्ये फुट पडली असेल तरी आम्ही त्यांना एकत्र आणू असे कर्मचारी सांगत होते.पण जोपर्यंत आम्हाला राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here