एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या ! बुलढाणा जिल्ह्यातील अंत्रि खेडेकर शिवारातील खळबळजनक घटना…

बुलढाणा :- अभिमान शिरसाट

आज 16 एप्रिलला पहाटे अंत्री खेडेकर परिसर एका वेगळ्याच घटनेने हादरला मॉर्निंग वॉकला निघालेल्या ग्रामस्थांना अंत्रि खेडेकर आणि मेरा खुर्द च्या मध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशान मृतदेहावर दिसत असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट जाणवले.

घटनास्थळी अंढेरा पोलीस पोहोचले असून वृत्त लिहिस्तोवर पंचनामा चालू होता. खूनाचा माग काढण्यासाठी बुलढाणा वरून श्वानपथक आणि ठसे तज्ञ ही घटनास्थळी दाखल झाले.माधुरी भीमराव मोरे वय 25 राहणार अंत्रि खेडेकर तालुका चिखली असे या खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

त्या एसटी बस महामंडळात वाहक म्हणून बुलढाणा आगारात कार्यरत होत्या. दुर्दैवाची गोष्ट अशी की, परवाच त्यांचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. आणि मिळालेल्या माहितीनुसार त्या साखळी तालुका बुलढाणा येथे मावशीच्या घरी मुक्कामी होत्या. काल ड्युटी करून आज त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने त्या घरी अंत्रि खेडेकर ला परतणार होत्या.

मात्र थेट त्यांचा मृतदेह भल्या पहाटे अंत्रि खेडेकर च्या शिवारात आढळला आणि सर्वत्र खळबळ उडाली .मृतदेह संशयास्पद अवस्थेत असल्याने खून झाल्याचे दिसून येत आहे. भल्या पहाटे मॉर्निंग वाकला बाहेर पडलेल्या ग्रामस्थांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी गावात ही माहिती दिली.

त्यानंतर पोलिस पाटलांनी, पोलिसांना ही माहिती दिली यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार आठवले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खून झालेला असल्याने बुलढाणा वरून श्वानपथक व ठसे तज्ञांनाही बोलवण्यात आले. पंचनामा करून हत्या करणाऱ्याचा माग काढला जात आहे .दरम्यान मिळालेल्या माहितीवरून माधुरी यांचा पाच वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. यापूर्वी त्या जाफराबाद आगारात कार्यरत होत्या.

तिथे असताना एक, एसटी वाहक यांची नेहमीच छेड काढायचा अशी माहिती समोर येत आहे. छेड काढणाऱ्या त्या वाहकाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी बुलढाणा आगारात बदली करून घेतली होती. अशी माहिती माधुरीच्या वडिलांकडून मिळाली. पोलीस प्रशासन ही त्यादृष्टीने तपास करणार आहेत. खून होण्यापूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे.

एसटी वाहक माधुरी मोरे यांच्या खुणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोकशाहीप्रधान देशात महिला सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here