तिरोडा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपला आंदोलन स्थळी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी दिली भेट…

आंदोलनाला पाठिंबा देत योग्य पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन…!

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या वतीने तिरोडा आगार च्या समोर दि. 30 आक्टोबर 2021 पासून सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन स्थळी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या मागण्या रास्त असुन त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

त्यांच्या मागण्यांकरिता आपण खासदार प्रफुल पटेल , मुख्यमंत्री व संबंधित परिवहन मंत्री व शासन दरबारी योग्य पाठवुरवा करणार असल्याचे यावेळी उपस्थित आंदोलक कर्मचारी यांना आश्वासित केले. यावेळी रविकांत(गुड्डू) बोपचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक कार्यकारी अध्यक्ष भवानीसिंह बैस,

माजी तालुका युवक सोशल मिडिया प्रमुख भुमेश्वर पारधी, माजी शहर सोशल मिडिया प्रमुख टिपू सैय्यद आदींसह मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी, पत्रकार महोदय व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here