Saturday, April 20, 2024
HomeBreaking NewsSSC Result 2023 | उद्या लागणार १०वीचा निकाल...'या' वेबसाईटवर चेक करा...

SSC Result 2023 | उद्या लागणार १०वीचा निकाल…’या’ वेबसाईटवर चेक करा…

Share

SSC Result 2023 : मागील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाच्या दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या म्हणजे २ जुनला दुअप्री १ वाजता लागणार आहे.

दहावीच्या निकालाची (SSC Result 2023) तारीख जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची परिस्थिती असल्याने शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी शिक्षण मंडळाने ही सूट काढून घेण्यात आली होती. परिणामी याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.97 टक्क्यांनी लागला.

यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.

खालील वेबसाईटवर जाऊन आपला निकाल बघू शकता…

  1. mahresult.nic.in
  2. https://ssc.mahresults.org.in
  3. http://scresult.mkcl.org

Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: