SRPF जवानाचे हदयविकाराच्या धक्काने निधन…नरखेड तालुक्यातील येनिकोणी गावात पसरली शोककळा

अतुल दंढारे –ता–१९
प्रतिनिधी नरखेड जिल्हा – नागपुर

धाबेपवनी (जिल्हा गोंदिया) येथील भारतीय राखीव बटालियन क्रमांक – २ एसआरपीएफ -१५ येथे कार्यरत जवान निलेश शंकर सराते वय ३० वर्ष रा. येनिकोणी तालुका नरखेड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निलेश सराते हे शनिवारी रात्री १२ ते २ वाजता पर्यंत पहाऱ्यावर होते.

रविवारी सकाळी उठून व्यायाम केला त्यानंतर घाबरल्या सारखे वाटल्याने नीलेश सराते यांनी पोलीस उपनिरीक्षक वैध यांना कळविले त्यांना उपचारासाठी तेथील डॉ कापगते याच्याकडे आणले असता ते गाडी मधून उतरून हाॅस्पीटलमध्ये बसले यांच दरम्यान त्यांना हदयविकाराचा धक्का बसला डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले नीलेश सराते यांच्या मृत्यूची बातमी कळताच येणिकोणी गावात शोककळा पसरली

नरखेड तालुक्यातील येणिकोणी येथील शेतमजुर शंकर सराते यांना दोन मुले आहेत लहान मुलांने पदवी प्राप्त करून कुटुंबाचे पालन पोषन करण्याकरिता जिद्दीने राज्य राखीव पोलीस दलात २०१७ ला नोकरी मिळवली घरी ३–४ एकर शेती त्यावर कुटुंबाची मंदार वडिलांनी दोन मुली चे लग्न केले निलेश यांच्या नौकरी नंतर कुटुंबात आथिर्क स्थैर्य आले त्यातच रविवारी नियतीने घात केला सराते कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर पसरला निलेश यांचे आई वडील भाऊ या घटनेने पुर्णता कोडमडले असल्याची स्थिती होती

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान निलेश सराते यांचे पार्थिव गोंदिया येथून राज्य राखीव पोलीस दलाच्या गुप १५ बटालियन सोबत येणिकोणी येथे पोहोचले कुटुबीयासह गावकऱ्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर बटालियन कडुन निलेश सराते यांला मानवंदना देण्यात आली त्यानंतर मोठे भाऊ दिनेश सराते यांनी धार्मिक विधी पार पाडत स्थानिक स्मशान भुमीत निलेश सराते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले राज्य राखीव पोलीस दलाचे १५ चे अधिकारी विनोद राय , संजय गाडेकर , नरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार जयपालसिंग गिरासे , येणिकोणी च्या सरपंच उषा फुके , माजी सरपंच मनीष फुके , तसेच गावकऱ्यांनी , अनेक मान्यवरांनी याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here