श्रीलंकेचा तुफानी गोलंदाज लसिथ मलिंगाची निवृतीची घोषणा…लवकरच नव्या भूमिकेत येणार

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – श्रीलंकेचा तुफानी गोलंदाज लसिथ मलिंका, ज्याने आपल्या चेंडूने अनेक दिग्गज फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत असा क्रिकेटप्रेमींना आवडणारा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणाऱ्या मलिंगाला आता लीग क्रिकेट खेळताना दिसणार नाही.

मलिंगाने मंगळवारी ट्विट करून ही माहिती शेअर केली. त्याने ट्विट करून म्हटले की, मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार.

आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर करेन. म्हणजे मलिंगा आता लवकरच प्रशिक्षकाच्या भूमिकेत येणार आहे. मलिंगा गेल्या वर्षापासून टी -20 क्रिकेटपासून दूर आहे.

त्याने आयपीएल २०२० मधून आपले नावही मागे घेतले होते आणि मुंबई इंडियन्सने कळवले होते की मलिंगाने आता खेळाला अलविदा म्हणायचे ठरवले आहे.

मलिंगा टी 20 मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची टी -20 कारकीर्द अतुलनीय होती. आयपीएलमध्ये ते मुंबई इंडियन्सचे महत्त्वाचे सदस्य होते.

मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा हॅट्ट्रिक घेतली, तर सलग ४ विकेट घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट घेणारा मलिंगा पहिला गोलंदाज आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. गोलंदाजीशिवाय मलिंगाने फलंदाजीत २०१०मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. मलिंगाने अँजेलो मॅथ्यूजसोबत ९व्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली, जो अजूनही एक विश्वविक्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here