वजीराबादच्या डी. बी. पथकाने मोटार सायकल चोराकडून जप्त केल्या सात मोटार सायकली…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने दिनांक 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पो.उप.अधिक्षक ईतवारा सिद्धेश्वर भोर यांनी शहरातील सर्व पो.स्टे.च्या डी.बी. पथकाची बैठक घेवुन मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकिस अणण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली 20 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे वजीराबाद येथील डी.बी. पथकाचे पोलीस अधिकारी सुनिल पुगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक,पो.उप.नी.शेख अब्दुल रब,पोलीस नायक गजानन किडे,बबन बेडदे,संजय जाधव,पोकॉ चंद्रकांत बिरादार,

संतोष बेलुरोड, शरदचंद्र चावरे, जसप्रितसिघ शाहु , नितीन भुताळे असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत आंबेडकर पुतळा या ठिकाणी अलो असता एक इसम संशयीतरीत्या मोटारसायकलसह मिळून आला.

त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरोपी मोहमद आतिक मोहमद रफीक वये 20 वर्षे, व्यवसाय – बेकार रा.कोटबाजार कंधार ता.कंधार जि.नांदेड ह.मु.खुदबेनगर पाकीजा फंक्‍शन हॉलच्‍या पाठीमागे देगलुर नाका नांदेड त्याचे ताब्यातील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत अधिक चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही तेलंगना राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहुन अनखीन सहा गाडया चोरल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे त्याच्या ताब्यातुन एकुण सात मोटार सायकली किमंत अंदाजे 350000/- रुपयाच्या जप्त करण्यात आल्या आहेत.

त्याचेकडुन पोलीस ठाणे उमरी येथील दोन ,पोलीस ठाणे कंधार येथील एक,पो.ठाणे कळमनुरी जि.हिंगोली येथील दोन ,तेलंगणा राज्य येथील एक,व इतर एक असे एकुण मोटार सायकल चोरीचे सात गुन्हे उघकिस आणले आहेत.

सदर मोटरसायकल चोरटा हा चोरीचे मोटरसायकल विक्री करताना सर्वसामान्य लोंकाना कागदपत्र नंतर आणुन देतो अशी बतावणी करुन चोरीच्या मोटरसायकली विकत असल्याची माहीती समोर आली आहे.

सदर मोटरसायकल चोरटयास पोलीस ठाणे कंधार येथील गुरन 287/2020 कलम 379 भादंवी मधील गुन्हयाचे तपासीक अमलदार वसंत राठोड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.त्याचेकडुन इतर अणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.वजिराबाद डी.बी.पथकाने मोटार सायकलचोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here