पुराने बाधित गावात रोगप्रतीब्ंधक औषधांची फवारनी;आरोग्य कर्मचारी व ग्रा.प.कर्मचा यांचा सहभाग…

लाखांदर – नास्तिक लांडगे

गत 28 ऑगस्ट रोजी चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पुराने बाधित गावात कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व बाधित गावातील ग्रापं प्रशासना अंतर्गत रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी व पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.

सदर मोहीम गावातील पुराचे पाणी ओसरताच गत 1 सप्टेंबर पासून राबविणे सुरू करण्यात आले आहे. गत 28 ऑगस्ट रोजी लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे कुडेगाव प्रा.आ. केंद्रांतर्गत येणाऱ्या अधिकतम गावात पुराचे पाणी शिरले होते.

सदरच्या पाण्यामुळे चुलबंद व वैनगंगा नदी काठावरील सर्वच गावात गाळ जमा होतानाच दुर्गंधी देखील निर्माण झाली आहे. अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील गाळाच्या विळख्यात सापडल्याने संबंधित गावातील ग्रा प कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे.

पुरामुळे गावात निर्माण झालेली दुर्गंधी व जीवजंतू प्रतिबंधासाठी टेमिफास्ट व सोडियम हायपोक्लोराईड आदी औषधांची फवारणी देखील केली जात आहे. सदरची रोग प्रतिबंधक मोहीम वैनगंगा व चुलबंद नदी काठावरील गावात कुडेगाव प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रजनीकांत मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात प्रा.आ. केंद्रांतील सर्वच उपकेंद्र अंतर्गत जोरात राबविणे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here