पातुर येथे राष्ट्रधर्मं युवा मंचच्या युवक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

पातुर – निशांत गवई

पातुर येथील बाळापूर रोड स्थित गुरुदेव सेवाश्रम येथे राष्ट्रधर्म युवा मंचच्या वतीने युवक मेळावा नुकताच संपन्न झाला.या मेळाव्याला युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा विचार युवकांपर्यंत पोहचवावा या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी राष्ट्रधर्म युवा मंचची स्थापना केली.

त्यानुसार केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांनी पश्चिम विदर्भ प्रचार दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार आज दि 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता युवक मेळावा पातुर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रधर्म युवा मंचचे केंद्रीय अध्यक्ष डॉ रामेश्वर बरगट यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली, तर केंद्रीय उपाध्यक्ष डॉ नरेंद्र तराळे, प्रवक्ते प्रा. विनोद वेरूळकर, सचिव मनिष देशमुख,

पश्चिम विदर्भ प्रमुख अंकुश मानकर, युवा प्रबोधनकार मनोज महाराज चौबे आदी वक्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेवाश्रमचे अध्यक्ष ह भ प तिमांडे महाराज, उपाध्यक्ष संजय पाटील , रामराव माहुलीकर, जेष्ठ संगीत तज्ज्ञ प्रा विलासराव राऊत, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहीले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक मंगेश राऊत यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवक मेळाव्याचे संचालन मनोज इंगळे यांनी तर आभार शुभम उगले यांनी मानले. राष्ट्र वंदनेने संमेलनाची सांगता झाली. या युवक मेळाव्यात राष्ट्रधर्म युवा मंच पातुर तालुका अध्यक्ष संदीप गिऱ्हे, मंगेश राऊत, मनोज इंगळे, शुभम उगले,सागर राखोंडे, आकाश गाडगे,प्रविण राऊत,प्रज्वल भाजीपाले,युवाश्री विशाल राखोंडे,

हरीश सौंदळे सर, माळी युवक संघटना (अकोला अध्यक्ष – चंद्रकांत बारताशे ) जीवन ढोणे, अनिल निमकंडे, जयवंत पुरुषोत्तम, भावेश गिरोळाकर,किरणकुमार निमकंडे, प्रा. भोंगळे पाटील सर, प्रा. कवडकार सर,सुभाष महाराज इंगळे,रवी देवकते, राहुल हिरोडकर,शुभम राऊत,अरविंद भाजीपाले, दिलीप खाकरे ,

हरिओम अटायकर,शिवाजी कुकडकार, सुभाष ठाकरे तसेच राष्ट्रसंतांचे आजीवन प्रचारक रामरावजी माहुलीकर, जेष्ठ कलाकार गजाननराव गिर्हे,व बहुसंख्येने पुरुष व महिला तसेच युवक-युवती आणि सर्व कार्यकरणी राष्ट्रधर्म युवा मंच पातुर तालुका तसेच गुरुदेव प्रेमींची उपस्थिती या कार्यक्रमाकरिता लाभली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here