सौंदलगा येथे समाजसेवक श्रीरंग पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

राहुल मेस्त्री

सौंदलगा ता.निपाणी येथील दिवंगत समाजसेवेक श्रीरंग दत्तात्रय पाटील याच्या स्मरणार्थ वरद क्लिनीकचे डॅा. रणजीत पाटील यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या वेळी कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या आरोग्य तपासणीला रक्तदान शिबिरात डॅा. स्वप्नील डवर,डॅा. सुमित देसाई,डॅा. अभिजीत चौगुले,डॅा. विनायक पिलावरे.,डॅा. ओमकार जगताप,डॅा. शुभम वळिवडे,डॅा. दिगंभर भोसले,डॅॅा. अनिरुध शिंदे,डॅा. स्वप्नील पाटील यांचे सहकार्य मिळाले. सेवा क्लिनीक लॅब मार्फत रक्तगट आणि शुगर मोफत चेक करण्यात आले.

तर अंकुर ब्लड बँक निपाणी यांचे मार्फत सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी 71 तरुणांनी रक्तदान केले.91 रुग्णांचे शुगर BP चेक करुन योग्य मार्गदर्शन देण्यात आले …या शिवाय शाळेच्या 400 मुलां मुलिंचे रक्तगट फ्री तपासण्यात आले. या वेळी येथील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि सरकारी मराठी मुलांच्या मुलिंच्या आणि कन्नड शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

रणजित पाटील यांच्या परिवारा कडून कोरोणा काळांनंतर शाळा प्रारंभ झाल्यावर येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन मोफत वितरण केले होते.यावेळी बजरंग पाटील याांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट आणि बॅग मोफत वितरण केले.

या शिबिरात येथील नाथ मेडिकल यांचेही सहकार्य लाभले.यावेळी दत्तात्रय पाटील, शशिकांत पाटील, प्रसाद इनामदार तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.सुत्रसंचलन अनिल शिंदे तर आभार डॅा.रणजीत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here