गुन्हाचा तपास योगेश पारधी पोलीस निरीक्षक पोस्टे तिरोडा यांचे मार्गदर्शन खाली स पो नि अभिजित जोगदंड हे करीत आहेत…

गोंदिया – अमरदिप बडगे

दि. 13/11/2021 रोजी 05.00 या वाकिंग करण्या करिता घरुन विर्सी कडे जाणारा मेन रोड ने धापेवाडा प्रकल्प कडे जावुन वाकींग करुन घरी परत येत असतांनी अंदाजे 95.20 वा. चे दरम्याण राधेलाल पेट्रोल पंप चे समोर तुमसर कडुन तिरोडा येणा-या चारचाकी वाहन क्र. MH- 49/BK- 9125 अर्टिका चारचाकी वाहनाचे चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवुन तिघांना मागेहुन धडक दिली त्यामध्ये पुतन्या नामे निखील उपरकर यास डोक्याला गंभीर जखम झाली व रक्त निघाले व डावे पायाचे पुर्ण हाड मोडले त्यामुळे तो गंभीर जख्मी झाला त्यास उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकामी भरती केले असता तो दवाखान्यात मरण पावला आहे.

पुतनी नेहा उपरकर हिचे उजव्या पायाला झखम झाली आहे. तसेच भाउ राजु उपरकर याचे कमरेला मार लागला आहे पुतनी व भाउ हे उपचार घेवुन सध्या घरी आहेत. वरील तिन्ही लोकांना मागेहुन धडक देणारे वाहन क्र . MH-49/BK- 9125 अर्टिका चारचाकी वाहनाचे चालकाचे नाव गाव माहित केले असता चालकाचे नाव- प्रणय मुकेश उके रा. रेल्वे स्टेशन रोड तिरोडा असे असल्याचे माहित झाले.

करीता पुतन्या १)नामे- निखील राजु उपरकर, वय-31 वर्ष, २) पुतनी नामे नेहा राजु उपरकर, वय- 30 वर्ष, भाउ ३) राजु हरीलाल उपरकर वय- 60 वर्ष, तिन्ही रा.साई कॉलोनी तिरोडा यांना वाहन क्र. MH-49/BK- 9125 अर्टिका चारचाकी वाहनाचे चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवुन तिघांना मागेहुन धडक देवुन पुतन्या निखील उपरकर याचे मरणास कारणीभुत झाला तसेच पुतनी नेहा उपरकर व भाउ राजु उपरकर यांना जखमी होण्यास कारणीभुत झाल्याने सदर वाहनाचे चालक नामे – प्रणय मुकेश उके रा. रेल्वे स्टेशन रोड तिरोडा याचेवर कायदेशीर कार्यवाही होणेस पोलीस स्टेशनला लेखी रीपोर्ट देत आहे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here