विशेष रेल्वे गाड्यांचा दर्जा काढून नियमित गाड्या होणार…

फोटो- फाईल

गोंदिया – अमरदिप बडगे

कोरोनामुळे देशातील सगळीकडे परिस्थिती वाईट निर्माण झाली होती.अशामध्ये रेल्वे सेवा सुध्दा बंद होती.आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे रेल्वे कडून रेल्वेगाड्या पुर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत जाणाऱ्या व गोंदिया रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या गाड्या नियमित करण्यात आल्या आहेत.यामुळे जवळपास दीड वर्षानंतर रेल्वे प्रवास करताना मिळेल.यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक रेल्वे गाड्या विशेष एक्स्प्रेस म्हणून चालविण्यात येत होत्या.यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भांडे द्यावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सुद्धा होत होते. मात्र आता १५ नोव्हेबरपासुन या विशेष गाड्याचा दर्जा काढण्यात आल्याने विशेष गाड्या नियमित केल्याने रेल्वे भांड्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकावरून परिचलन होणा-या महाराष्ट्र एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेस या नियमीत करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत परिचलन होणा-या एलटीटी- हावडा एलटीटी एक्सप्रेस, नागपूर- अहमदाबाद-नागपूर – प्रेरणा एक्सप्रेस, नागपूर- कोल्हापूर- नागपूर एक्सप्रेस,पुणे- नागपूर एक्सप्रेस, एलटीटी-शालीमार एलटीटी एक्सप्रेस, पुणे -नागपूर पुणे,गरीबरथ एक्सप्रेस,

एलटीटी-पुरी एलटीटी एक्सप्रेस, मुंबई-नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई-नागपुर एक्सप्रेस,अजनी -पुणे एक्सप्रेस,पुणे- हावडा-पुणे एक्सप्रेस,या सर्व गाड्या नियमित करण्यात आल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांना लांब अंतराचा प्रवास करणे सहज शक्य होणार असुन प्रवाशांना देखील प्रवास करणे देखील सोयीचे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here