Wednesday, May 31, 2023
Homeगुन्हेगारीविशेष पथकाची पातूर येथे अवैध धंद्यावर धाड...लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह एकास अटक...

विशेष पथकाची पातूर येथे अवैध धंद्यावर धाड…लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह एकास अटक…

पातूर : शहरातील एका धाब्यावर अवैध पेट्रोल डिझेलची अनधिकृत विक्री होत असल्या चि गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी यांच्या पथक ला मिळाली असता आज दिनांक 24 मे ला मिळाली असता या पथकाने या ठिकाणी धाड टाकून लाखो रुपया चा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक करण्याची घटना सायंकाळी पाच वाजता चे दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम महामार्ग वरील एका ढाब्या जवळ अवैध पेट्रोल डिझेल चि विक्री होत असतांना उपविभागीय अधिकारी गोकुळराज यांच्या पथक ने या ठिकाणी धाड टाकून एक पिकअप व्हॅन क्रमांक MH 29 AT 0048 पेट्रोल डिझेल व इतर साहित्य असा एकूण 11,88000 रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मो. फरहान वय 40 रा. अकोला यास अटक करण्यात आली आहे.

सदर ची कारवाई उपविभागीय अधिकारी गोकुळराज यांच्या मार्गदर्शन खाली श्रीराम जाधव व पोलीस उप निरीक्षक, उप वी. अधी. कार्यालय बाळापूर यांनी कारवाई केली असून फिर्यादी श्रीराम जाधव यांच्या तक्रारी वरून आरोपी मो. फरहाण याचे विरुद्ध अप क्रमांक 249/23 कलम 285,3,7 जिवन्यश्यक्य वस्तू नुसार भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: