वानखेडे प्रकरणात मागासवर्गीयांच्या हक्काबाबत बोलणाऱ्या मंत्री मलिक यांनी सामाजिक न्याय व मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण समिती बाबतही बोलावे – प्रशांत सदामते यांचा सवाल…

सांगली – ज्योती मोरे

मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मागासवर्गीयांच्या हक्कावर आणि अधिकारावर कशा पद्धतीने गदा आणली जाते. हे दाखवून दिले आहे. परंतु आता, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय मंत्रीपदावर विश्वजीत कदम आणि मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण समितीवर, अजित दादा पवार कशा पद्धतीने रुजू आहेत?

या दोघांनीही मागासवर्गीयांचा हक्क आणि अधिकार हिरावून घेतला आहे, तो कोणत्या अधिकाराने? हेसुद्धा मंत्री नवाब मलिक यांनी सांगावे. असा सवाल राष्ट्रविकास सेनेच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी उपस्थित केला आहे.

प्रशांत सदामते

दरम्यान याबाबतीत आपली जबाबदारी स्वीकारून हे दोघेही आपापल्या पदाचा राजीनामा देणार का आणि राज्यात मागासवर्गीयांवर होणारे अन्याय आणि अत्याचार कधी थांबणार याचंही उत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिले पाहिजे अशी मागणीही प्रशांत सदामते यांनी यावेळी बोलताना केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here