हाथरस प्रकरणात एसपी, डीएसपी आणि निरीक्षक निलंबित…योगी सरकारची मोठी कारवाई…

हाथरस घटनेत योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसचे निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तिघांना निलंबित करून त्याची नार्को पॉलीग्राफ चाचणीही घेतली जाईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे विद्यमान एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिस ठाण्याचे सर्व पोलिस, फिर्यादी व प्रतिवादी साठी पॉलिग्राफी चाचणी घेण्यात येणार आहे. एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंग अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

त्याचबरोबर हाथरसच्या जिल्हा अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. परंतु सध्या त्या व्यक्तीचे नाव यादीत नाही. हाथरस प्रशासनाने ज्या प्रकारे संपूर्ण प्रकरण हाताळले त्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अत्यंत नाराज आहेत.

या संपूर्ण प्रकरणात हाथरसचे जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार व एसपी यांनी आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली नाही,सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही डीएम प्रवीण कुमार यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर धमकी आणि दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी एक व्हिडिओ समोर आला असून त्यात हाथरसचे डीएम पीडितेच्या कुटुंबाला धमकावताना दिसतात. हाथरसचे डीएम म्हणत आहेत की मीडियाचे लोक निघून गेल्यावर तुम्हाला प्रशासनाला येथेच रहावे लागेल. त्यांना धमकावले जात असल्याचे हाथरसच्या पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. सदर प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्या जात आहे.

1 COMMENT

  1. असं प्रशासन असणं दुर्दैवी , पन त्याहीपेक्षा बेशरम लोकप्रिनिधींनी जे गरीब कुटुंबाला न्या आसाठी पुढे येत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here