तेल्हारा – गोपाल विरघट
तेल्हारा तालुक्यातील शिवारात मुंग,उडित पीक पेरी पेक्षा सोयाबीनचा अधिक पेरा आहे यावर्षी मागील सोयाबीन पिकावर (लीफ क्रिनकल व्हॅायरस अटॉक) मोठया प्रमाणात दिसत आहे त्यामुळे मुंग, उडित पीक प्रमाणे सोयाबीन हे पीक सुध्दा संकटात सापडले आहे, त्यामुळे शेतकरी कमालीचा घाबरून गेला आहे,

असे जर व्हायरस आले तर शेतकऱ्यांनी काय पेरावे कापसावर बोंड अळी ,तुरीचे पाने पिवळे पडून गळत आहेत असे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक हातातून निघून गेले तर शेतकऱ्यांना आत्महत्या दुसरा मार्ग दिसत नाही त्यामुळे मुंग ,उडित पिका सोबत सोयाबीनचा सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील शेतकरी करत आहे.