पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही…शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर ‘शोले’ आंदोलन…

अमोल साबळे

अकोला : अकोला जिल्ह्य़ातील सोयाबीन पिके उगवलेली नसल्याने शेतकरी वर्ग संकटात आहे. अशाच प्रकारे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानी पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.


प्राप्त माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबोड येथील आंदोलन कर्ता शेतकरी महादेव नाजुकराव वानखडे तसेच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ खुमकर, बाळापूर तालुका अध्यक्ष गोपाल पोहरे, प्रशांत विरोकार सहभागी झाले होते.

यांनी आज सोमवार दुपारी गावातील पाण्याच्या टाकीवर चढूण शोले आंदोलन केले. या शेतकऱ्यांने अकोला जिल्हातील सोयाबीन उगावलेच नसल्याने केले. असून यामध्ये त्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. परंतु शेतातील सोयाबीन उगावलेच नसल्याने सदर शेतकरी संकटात सापडला आहे.

पानाच्या टाकीवरून घेतलेले चित्र

दरम्यान शासनाने परिपत्रकानुसार आपली बियाणेची सोय प्रशासनाने करून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. पालकमंत्र्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व याबाबत निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नसल्याने या शेतकऱ्यांने शोले आंदोलन चा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान या आंदोलनामुळे प्रशासनाची चागलीच तारांबळ उडाली आहे. यावेळी जिल्हा व्यवस्थापक महाबीज जगदीशसिंग खोकड, तालुका कृषी अधिकारी श्री नंदकिशोर माने, अग्रीकल्चर अॉफीसर पंचायत समिती बाळापूर श्री. मुंदडा साहेब, उरळ पो.स्टे ठाणेदार विलास पाटील याप्रसंगी शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

१)बोगस बियाणेवर कारवाई करण्यात येईल
२) शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व बियाणे उपलब्ध करून देण्यात येइल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here