महापुरात वाहून गेलेल्या बेला-कोरंभी रस्त्याच्या कामाला सुरूवात…

सोनकुसरे दाम्पत्यांच्या पाठपुराव्याला आले यश…

भंडारा – ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात बेला ते कोरंभी हा मार्ग वाहून गेला होता. परिणामी येथील नागरिकांना भंडारा शहरात येण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्याची मुख्य अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे या दाम्पत्यांनी प्रशासनाकडे या मार्गाचा विषय लावून धरला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या २९ आणि ३० तारखेला भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. दरम्यान, मध्यप्रदेशातील सरोवराचे पाणी सोडण्यात आले होते. यामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांचा संसार उघड्यावर आला. या महापुरात बेला ते कोरंभी हा प्रमुख सुमारे एक किलोमीटरचा रास्ता अक्षरशः वाहून गेला. तर रस्त्याच्या काही भागात २० फूटाची खोल दरी पडली.

हा मार्ग वाहून गेल्याने या परिसरातील शेतकरी असो वा नागरिक त्यांना आवागमन करण्यासाठी मोठी तारेवरची करसत करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेत, ग्रामपंचायत बेला व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी रस्ता सुरू करण्यात आला होता.

मात्र, हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना वाहनधारकांना दिवस असो किंवा रात्री जोखीम पत्करून प्रवास करावा लागत होता. या महापुराने हा मार्ग काही ठिकाणी उखडला, कुठे खोल खड्डे पडले तर काही भाग तर वाहून गेला होता.

त्यामुळे हा मार्ग पूर्ववत करासाठी मुरुमाची अधिक प्रमाणात आवश्यकता असल्याची बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांच्या लक्षात आली. सोनकुसरे दाम्पत्यांनी या मार्गाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला.

यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा खनिकर्म अधिकार राजविलास गजभिये व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवन यांच्याकडे या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रश्न लावून धरला. यासाठी प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने सदर रस्त्याला लागणाऱ्या मुरून उत्खननासाठी सर्व परवानगी प्रशासनाने दिली. आजपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

मागील महिनाभरापासून बंद असलेला हा रस्ता यशवंत सोनकुसरे व जया सोनकुसरे यांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्याने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यशवंत सोनकुसरे यांच्या उपस्थितीत बेला – कोरंभी या रस्त्याचे काम सुरू झाले. यावेळी मनोहर नागदेवे, टांगले चंद्रहास राखडे, तितिरमारे, आकाश तिजारे, बंडू चेटुले, भास्कर गजभिये, गणेश टिचकुले व चैतराम सेलोकर यांच्यासह ग्रामस्थ आणि शासकीय कर्मचारी, कंत्राटदार उपस्थित होते.

भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवून दळणवळण प्रभावित होऊ नये, यासाठी सदर रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करणे गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसे पुनर्वसन विभागाला निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन या मागणीचा नक्कीच विचार करेल अशी, अपेक्षा आहे.

यशवंत सोनकुसरे
जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भंडारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here