अमरावतीत ‘सोनेरी भोग’ सोन्याची मिठाई…किंमत ऐकून थक्क व्हाल..

न्यूज डेस्क – अमरावतीत ‘सोनेरी भोग’ सोन्याची मिठाई खास आकर्षण बनली आहे, दिवाळी निमित्य अमरावतीच्या नामांकित असलेल्या रघुवीर मिठाई यांनी तयार केलेली शुद्ध सोनेरी वर्क लावलेली “सोनेरी भोग” ही मिठाई बाजारात आणली आहे.

विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता ‘सोनेरी भोग’ सोबत अन्य विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध करून दिल्या आहेत. तर या मिठाईची किंमत ७ हजार रुपये प्रती किलो प्रमाणे आकारण्यात आले असल्याने अमरावतीकरांसाठी आहे.

पिस्ता, केसर आणि हेजलनट या ड्रायफ्रुट पासून ही मिठाई तयार करण्यात आली असून या मिठाईवर खास दिल्लीच्या नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कँरेट अर्कापासून सर्टिफिकेटसह बोलावून मिठाईवर लावलेला आहे तर राजस्थान मधील कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी व पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here