मत्तीवडे येथे सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा सत्कार…

राहुल मेस्त्री

आज आपण आपल्या घरात दहशदवादयापासुन सुरक्षित आहोत.याच कारण भारतीय सिमेवर डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असणारे भारतीय सैन्यदलातील जवान.म्हणूनच हे जवान गावी आल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्याकडे आदराने बघत असतात आणि सन्मान करत असतात.

याच प्रकारे मत्तिवडे ता.निपाणी येथील नवश्या गणराज तरुण मंडळाच्या वतीने येथील भारतीय सैन्यदलात भरती झालेले अर्जुन साठे,ओमकार मोरे ,सर्जेराव डोंगळे हे तरुण सैन्य दलाय भरती झाल्यानंतर पहिल्याच सुट्टीला आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर भारतीय सैन्यदलातुन निवृत्त झाल्याबद्दल शिवाजी मोरे यांचा देखिल सत्कार करण्यात आला आहे.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक येथील परशुराम कदम यांनी केले.अर्जुन साठे यांचा सत्कार ग्रा.पं.सदस्य राजु डोंगळे यांनी केला. ओमकार मोरे यांचा सत्कार शिवाजी केसरकर यांनी केला, सर्जेराव डोंगळे यांचा सत्कार कृष्णात साठे यांनी केला. त्याच बरोबर शिवाजी मोरे यांचा सत्कार शंकर केसरकर यांनी केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक आप्पासो साठे हे होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बेळगाव जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे होते यावेळी माजी सैनिक आण्‍णासो केसरकर आणि जयवंत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेवटी आभार कृष्णात केसरकर यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी बाळासो साठे ,नामदेव साठे, रघुनाथ कांबळे, शिवाजी बेडगे ,भाऊ निकम यांच्यासह नवश्या गणराज तरुण मंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here