अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकरी संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी…मुख्यमंत्री सहायता निधीत दिली “कोरोना” लढ्यासाठी ५१ हजारांची आर्थिक मदत

भंडारा : कर्मचाऱ्यांच्या हितासोबतच त्यांच्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करून सदोदित महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी करणाऱ्या अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकरी पतसंस्थेने स्वतःची एक वेगळी ओळख भंडारा जिल्ह्यात निर्माण केली आहे. या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहायता निधीत “कोरोना” लढ्यासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

◆ देशासह राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. यात अनेकांचा बळी गेला असून मृत्यूच्या दारात असलेल्या कित्येकांवर उपचार सुरू आहे. यासाठी प्रशासनही दिवसरात्र एक करीत आहे. राज्यावर असलेल्या या संकटासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकरी पतसंस्था मर्या भंडारा र. न. १२७ संस्थेचे अध्यक्ष विजय देवगिरीकर, सचिव विकास बडवाईक, उपाध्यक्ष आर. जी. आत्राम,

संचालक डी. बी. पिकलमुंडे, एम. ए. कापगते, पी. एस. कुकडे, एल. एस. नवखरे, एम. के. नान्हे, आर. पी. गभने, सौ. के. ए. गोडबोले, कु. एस. डी. अतकरी, तज्ज्ञ संचालक एस. एन. खोब्रागडे, कार्यलक्षी संचालक के. आर. ठवरे या संचालक मंडळाने राज्यावर आलेल्या संकटात मदतीचा खारीचा वाटा उचलून मदत करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. यावेळी व्यवस्थापक आणि पत संस्थेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

◆ संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ५१ हजारांच्या निधीचा धनादेश भंडाराचे जिल्हाधिकारी एस. प्रदीपचंद्रन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात जमा करण्यात आला. हा धनादेश देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष विजय देवगिरकर, सचिव विकास बडवाईक, संचालक डी. बी. पिकलमुंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here