कोरोना च्या अस्मानी संकटावर ‘फतेशिकस्त’ मिळवा, स्व. बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गा देवी उत्सव मंडळ दत्त चौक यवतमाळ चे सामाजिक आवाहन…

यवतमाळ – सचिन येवले

स्वर्गीय बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गा देवी उत्सव मंडळ दत्त चौक यवतमाळ या वर्षी आपले 79 वे वर्ष साजरे करीत आहे. मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवित आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजी संबंधी सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा, स्वच्छता राखा इत्यादी विषयाचे संदेश देणारे आकर्षक भित्तीपत्रके मंडप परिसरात सजविले आहे.

सोबतच मंडपातून ध्वनिक्षेपक च्या माध्यमातून कोरोना विषयीचे सामाजिक संदेश वारंवार देत आहेत.कोरोना महामारी ला घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या, शासनाने दिलेले निर्देश पाळा व या महामारीवर फत्तेशिकस्त मिळवा, असे सामाजिक आवाहन मंडळाचे सचिव श्री देवा राऊत यांनी केले आहे.

मॉं जगदंबे चा उत्सव यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष श्री अतुल दवंडे, संचालक मंडळाचे मनोज भाऊ इंगोले, मनोज महल्ले, प्रमोद यादव, शंतनू शेटे, गजू गाडगे, संजय बदनोरे, शालिनीताई, मालुताई, मंजू दवंडे , अंशू शाहू बंडूभाऊ नाकतोडे,

सुरेश अग्रवाल मोहन भाऊ सोलंकी , बाल्या पंडित ,राजू ठाकुर ,उमेश लोंढे ,श्याम भाऊ सोलंकी, सुनील पांडे, शेखभाई जाकीर ,प्रदीप सावरकर जितू खत्री, गुंजन गावंडे, राजूभाऊ कनोजे, कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here