मूर्तिजापूर येथील सर्पमित्र संजय दौड यांचा अपघातात मृत्यू…

मूर्तिजापूर येथील प्रतिक नगर येथील रहिवाशी सर्पमित्र संजय दौड यांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी 5;00 वाजताच्या सुमारास घडली आहे. परिवारासह सासरवाडीहून दुचाकीने येत मूर्तिजापूर असताना कारंज्या अलीकडेच त्यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून मुलगा अत्यवस्थ सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संजय दौंड हे सासरवाडी वरून येत असताना वाघी गावाजवळ चार ते पाच दुचाकी आपसात भिडल्याने संजय दौड यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी आहेत. जखमींना वाशीम रुग्णालयात हलविण्यात आले आशयाची माहिती प्राप्त झाली आहे.

35 वर्षीय संजय दौड अत्यंत गरीब परिस्थिती हे कोणाचाही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता होता, त्याने आतापर्यंत अनेक सापांना जीवदान दिले आहे. तर उपजीवकेसाठी पान सेंटरचा व्यवसाय सुरु केला होता त्यातून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here